Last Updated: 19 Oct 2019 03:24 PM

India Top Stories

 Lokmat

 Maharashtra Times

 Prahar

 Raigad Times

 deshdoot

 navshakti

 tarunbharat

 • पाचशेहून अधिक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

  ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमधून पाचशेहून अधिक दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत आहेत. लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी याबाबतची माहिती दिली आहे. रणबीर सिंह म्हणाले, पाकव्याप्त काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ विविध प्रशिक्षण शिबिरांमध्ये पाचशेहून अधिक दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. तर 200 ते 300 दहशतवादी पाकिस्तानच्या मदतीने जम्मू-काश्मीरला अशांत ठेवण्यासाठी सक्रिय आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या शिबीराची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात घुसखोरी करण्यासाठी त्यांनी लाँचिंग पॅडही तयार केले आहे. मात्र, घुसखोरांना रोखण्यास लष्कराचे जवान सक्षम आहेत, असेही ते म्हणाले.

  The post पाचशेहून अधिक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत appeared first on तरुण भारत.

 • मतदानादिवशीच बसरणार पाऊस

  ऑनलाईन टीम / मुंबई : अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे मान्सूनने निरोप घेऊनही मुंबईत कालपासून हलक्या सरींना सुरुवात झाली आहे. मतदानादिवशी सोमवारी ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सोमवारी मुंबई, ठाण्यासह पालघरमध्ये गडगडाटासह पावसाची शक्मयता आहे. तर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्येही विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरातही तुरळक पावसाची शक्यता आहे. काल साताऱयात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेतही पावसाने जोरदार हजेरी लावली होती. आजही सकाळपासून अशाच प्रकारचे वातावरण असून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. आज विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने राज्यात दिग्गज नेत्यांच्या सभा आहेत. त्यांनाही या पावसाचा सामना करावा लागू शकतो.

  The post मतदानादिवशीच बसरणार पाऊस appeared first on तरुण भारत.

 • ‘असूस’चा डय़ुअल स्क्रीन लॅपटॉप लाँच

  ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : तैवानची प्रसिद्ध कंपनी आसूसने आपला डय़ुअल स्क्रीन लॅपटॉप भारतात लाँच केला आहे. दोन स्क्रीन असणारा जगातील हा पहिला लॅपटॉप असणार आहे. zenbook pro duo (UX581) आणि zenbook duo (UX481) अशी या लॅपटॉपची नावे आहेत. झेनबुक प्रो डय़ुओमध्ये देण्यात आलेली दुसरी स्क्रीन ही सलग आहे. तर, स्क्रीनला की-बोर्ड एवढी जागा देण्यात आली आहे. की बोर्डच्या वरील बाजूस दुसरी स्क्रीन आहे. ज्याच्यामुळे ही दुसरी स्क्रीन पहिल्या स्क्रीनची विस्तारीत स्क्रीन म्हणून दिसते. या लॅपटॉपमध्ये 15.6 इंचाची 4k UHD OLED HDR सपोर्टींग स्क्रीन असणार आहे. त्यामुळे कोणताही विंडो दुसऱया स्क्रीनवर ड्रग करता येणार आहे. मुख्य स्क्रीनवर नॅनो एज डिझाईनचा वापर करण्यात आला आहे. तसेच लॅपटॉपमध्ये नंबर पॅड डायल फंक्शनही देण्यात आला आहे. लॅपटॉपमध्ये 32 जीबी डीडीआर फोर रॅम असणार आहे. या लॅपटॉपचे वजन अंदाजे 2.5 किलो आहे. या दोन्ही लॅपटॉपची किंमत अनुक्रमे 2 लाख 9 हजार 990 आणि 89 हजार 990 रुपयांपासून पुढे आहे.

  The post ‘असूस’चा डय़ुअल स्क्रीन लॅपटॉप लाँच appeared first on तरुण भारत.

 • सलमानचा बॉडिगार्ड ‘शेरा’ शिवसेनेत

   ऑनलाईन टीम / मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याचा विश्वासू अंगरक्षक गुरमीत सिंग उर्फ शेरा याने शिवबंधन हाती बांधले आहे. काल रात्री उशीरा शिवसेनेच्या ट्विटर अकांऊंटवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मातोश्रीवर शेराने भगवा हाती घेतला. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शेराच्या हाती शिवबंधन बांधत पक्षात स्वागत केले. शेरा हा सलमान खान याचा अत्यंत जवळचा आणि विश्वासू बॉडिगार्ड आहे. मागील 22 वर्षापासून तो सलमान खानसोबत काम करत आहे. विधानसभा निवडणूक मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच शेराने शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी अखेरचा दिवस आहे. त्यामुळे शेरा आज शिवसेनेच्या प्रचारात उतरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

  The post सलमानचा बॉडिगार्ड ‘शेरा’ शिवसेनेत appeared first on तरुण भारत.

 • पटोलेंच्या गुंडांकडून परिणय फुकेंच्या भावाचे अपहरण करुन मारहाण

  ऑनलाईन टीम / भंडारा : भंडारा जिह्याचे पालकमंत्री आणि साकोली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांच्या भावाचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या गुंडांनी केला आहे. पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांचे अपहरण करून त्यांनाच जीवे मारण्याचा डाव नाना पटोले यांच्या गुंडांनी रचला होता, अशी धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. काल रात्री अंधारात पालकमंत्री समजून पटोले यांचा पुतण्या रिकी पटोले आणि काही गुंडांनी नितीन फुके यांना रस्त्यावरुन चालत असताना उचलून वाहनात घातले. त्यानंतर त्यांना पटोलेंच्या कार्यालयात नेऊन जबर मारहाण केली. गुंडांच्या मारहाणीत नितीन फुके गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर साकोली येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती.

  The post पटोलेंच्या गुंडांकडून परिणय फुकेंच्या भावाचे अपहरण करुन मारहाण appeared first on तरुण भारत.

 navprahba

 majhapaper

 abpmajha

 navamaratha

 vyaaspith.com

 loksatta

 mahanews.co.in

 worldmarathi